Lyrics

ही रात्र पावसाची, हा गंध जीवघेणा ही रात्र पावसाची, हा गंध जीवघेणा समजुनी या खाणा-खुणा... समजुनी या खाणा-खुणा नामी नको बहाणा ये ना तु दूर का? ये ना तु दूर का? अंगात गंध जसा डोळ्यात प्राण सजले रुजली कणाकणात स्वप्ने, पायी नुपूर जडले Hey, अंगात गंध जसा डोळ्यात प्राण सजले रुजली कणाकणात स्वप्ने, पायी नुपूर जडले तुझ्या अंगा-अंगाचा सुरेल रंगाचा दरवळतो तराना ये ना तु दूर का? ये ना तु दूर का? पाना-फुलात भरली गं अलवार शिरशिरी वाऱ्याला बिलगुनी थरथरते सावली हो-हो, पाना-फुलात भरली गं अलवार शिरशिरी वाऱ्याला बिलगुनी थरथरते सावली तु चंद्र चोर लपून-आडून घालीत आहे उखाणा ये ना तु दूर का? ये ना तु दूर का? ओठाला पाव्याचा बघ, होतो आज भार अंगात भरला गं स्वर कोवळा चुकार Hey, ओठाला पाव्याचा बघ, होतो आज भार अंगात भरला गं स्वर कोवळा चुकार वेडा तो खुळा राहील आता जो अशा या वेळी शहाणा ये ना तु दूर का? ये ना तु दूर का? ही रात्र पावसाची, हा गंध जीवघेणा ही रात्र पावसाची, हा गंध जीवघेणा समजुनी या खाणा-खुणा... समजुनी या खाणा-खुणा नामी नको बहाणा ये ना तु दूर का? ये ना तु दूर का? Hey, ये ना तु दूर का? ये ना तु दूर का?
Writer(s): Kedar Pandit, Mangesh Kulkarni Lyrics powered by www.musixmatch.com
Get up to 2 months free of Apple Music
instagramSharePathic_arrow_out