Lyrics

मैनाराणी, चतुर-शहाणी मैनाराणी, चतुर-शहाणी सांगे गोड कहाणी सांगे गोड कहाणी सांगे गोड कहाणी कहाणीत त्या पशुपक्ष्यांना अवगत असते वाणी सांगे गोड कहाणी सांगे गोड कहाणी सिंह वनाचा असतो राजा भिती त्याची चित्ती वाघ वागतो भिऊन त्याला गुडघे टेकी हत्ती अति चतूर पण कोल्हा कोणी अति चतूर पण कोल्हा कोणी सिंहा पाजी पाणी सांगे गोड कहाणी सांगे गोड कहाणी कोल्ह्याचाही काढे काटा कोणी करकोचा कोल्ह्याचाही काढे काटा कोणी करकोचा घरी बोलावुन पाणउतारा करी पाहुण्याचा कडीवरी त्या कडी करुनिया कडीवरी त्या कडी करुनिया टोला कोल्हा हाणी सांगे गोड कहाणी सांगे गोड कहाणी शाल म्हणुनिया खाल पांघरे गाढव वाघाची त्यास पाहता झोप उडाली जंगल भागाची एक कोंबडा उघडकीस पण एक कोंबडा उघडकीस पण ढोंगच त्याचे आणि सांगे गोड कहाणी सांगे गोड कहाणी मैनाराणी, चतुर-शहाणी मैनाराणी, चतुर-शहाणी सांगे गोड कहाणी सांगे गोड कहाणी सांगे गोड कहाणी
Writer(s): Shrinivas Khale, G D Madgulkar Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out