Listen to Koushalyecha Ram Bai by Manik Varma

Koushalyecha Ram Bai

Manik Varma

Devotional & Spiritual

24 Shazams

Lyrics

कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम भाबड्या या भक्तासाठी देव करी काम कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम एक एकतारी हाती, भक्त गाई गीत एक एक धागा जोडी, धागा जोडी जानकीचा नाथ (2) राजा घनश्याम कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम दास रामनामी रंगे, राम होई दास एक एक धागा गुंते, धागा गुंते रूप ये पटास (2) राजा घनश्याम कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम विणुन सर्व झाला शेला, पूर्ण होई काम ठायी ठायी शेल्यावरती, शेल्यावरती दिसे रामनाम रामनाम रामनाम दिसे रामनाम गुप्त होई राम कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम हळू हळू उघडी डोळे, पाही जो कबीर पाही जो कबीर विणोनिया शेला गेला सखा रघुवीर सखा रघुवीर कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम भाबड्या या भक्तासाठी देव करी काम कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम
Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out