Lyrics

रसिकहो, काळ बदललाय तो तर नेहमीच बदलत असतो जीवनातील्या अनेक गोष्टीचं मूल्य हरघडी बदलत असलेलं आपण पाहतो मग अश्यावेळेला संगीतकला त्याला कशी अपवाद असणार आज निखळ संगीत, केवळ श्राव्य असे संगीत ऐकण आणि अनुभवणं हे फार दुरापास्त होत चाललय असं मला वाटतं संगीताला काही दृश्याची जोड देऊन मगच ते आपल्याला पाहायला मिळत अश्यावेळी डोळे उघडे असले म्हणजे झालं कान मात्र बंदच करावे लागतात मात्र या कानावर आघात करणाऱ्या जोशपूर्ण संगीतात काहीतरी आकर्षण तत्व असणारच त्याशिवाय का ते तुम्हा-आम्हाला, सामान्य माणसाला भुरळ घालत तुम्ही-आम्ही हे संगीत ऐकत असताना हाता-पायांना ताल देत असतोच की मात्र या प्रथम श्रवणी झपाटनाऱ्या संगीताचा प्रभाव फारच थोडा वेळ टिकतो ते शिळ वाटू लागतं, हे ही सत्य नजरेआड करुण चालणार नाही वास्तविक सुरामाढेच इतकी शक्ती असते की सुरवालयक प्रभावशाली करण्यासाठी चटक-मटक दृश्यांच्या कुबड्यांची आवश्यकताच भासू नये असं संगीत जोपासावं असं मला मनापासून वाटतं अश्याच संगीताचा आनंद मनसोक्त लुटण्यासाठी परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या स्वरानुबंधाला सतत आशीर्वाद द्यावा हीच माझी सदिच्छा असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे फुलाफुलांत येथल्या फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे हवेत ऊन भोवती, सुवास धुंद दाटली हवेत ऊन भोवती, सुवास धुंद दाटली तसेच काहिसे मनी तसेच काहिसे मनी तुला बघून वाटले तृणांत फुलापाखरू, तसे बसेल गीत हे असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे स्वयें मनात जागते, न सूर-ताल मागते अबोल राहुनी स्वतः अबोध सर्व सांगते स्वयें मनात जागते, न सूर-ताल मागते अबोल राहुनी स्वतः अबोध सर्व सांगते उन्हें जळांत हालती, तिथे दिसेल गीत हे असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे कुणास काय ठाउके, कसे कुठे उद्या असू? निळ्या नभांत रेखिली, नकोस भावना पुसू कुणास काय ठाउके, कसे कुठे उद्या असू? निळ्या नभांत रेखिली, नकोस भावना पुसू तुझ्या मनीच राहिले, तुला कळेल गीत हे असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे तरी असेल गीत हे तरी असेल गीत हे
Writer(s): Yashwant Deo Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out