Lyrics

पहा टाकले पुसुनी डोळे... पहा टाकले पुसुनी डोळे, गिळला मी हुंदका रणांगणी जा सुखे, राजसा परतून पाहू नका, ओ, परतून पाहू नका पहा टाकले पुसुनी डोळे, गिळला मी हुंदका रणांगणी जा सुखे, राजसा परतून पाहू नका, ओ, परतून पाहू नका झडे दुंदुभी, झडे चौघडा झडे दुंदुभी, झडे चौघडा रणरंगाचा हर्ष केवढा, हर्ष केवढा एकदाच जन्मात लाभते... एकदाच जन्मात लाभते ही असली घटिका रणांगणी जा सुखे, राजसा परतून पाहू नका, ओ, परतून पाहू नका शकुनगाठ पदरास बांधुनी शकुनगाठ पदरास बांधुनी निरोप देते... निरोप देते तुम्हा हासुनी आणि लावते भाळी तुमच्या... आणि लावते भाळी तुमच्या विजयाच्या तिलका रणांगणी जा सुखे, राजसा परतून पाहू नका, ओ, परतून पाहू नका या देशाची पवित्र माती या देशाची पवित्र माती इथे वीरवर जन्मा येती, जन्मा येती तोच वारसा तुम्ही पोचवा... तोच वारसा तुम्ही पोचवा येणाऱ्या शतका रणांगणी जा सुखे, राजसा परतून पाहू नका, ओ, परतून पाहू नका पहा टाकले पुसुनी डोळे... पहा टाकले पुसुनी डोळे, गिळला मी हुंदका रणांगणी जा सुखे, राजसा परतून पाहू नका, ओ, परतून पाहू नका
Writer(s): Hridaynath Mangeshkar Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out