Lyrics

श्रावणात घन निळा बरसला श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशिमधारा उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा श्रावणात घन निळा बरसला जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी जिथे-तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी जिथे-तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी माझ्याही ओठांवर आले माझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारा श्रावणात घन निळा बरसला रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी निळया रेशमी पाण्यावरती थेंब-बावरी नक्षी गतजन्मीची ओळख सांगत गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा श्रावणात घन निळा बरसला पाचुच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले पाचुच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झाले मातीच्या गंधाने भरला मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा श्रावणात घन निळा बरसला पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा अशा प्रीतिचा नाद अनाहत शब्दावाचुन भाषा अंतर्यामी सूर गवसला अंतर्यामी सूर गवसला नाही आज किनारा श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशिमधारा उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा श्रावणात घन निळा बरसला
Writer(s): Mangesh Padgaokar, Shrinivas Khale Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out