Lyrics

अशी पाखरे येती, आणिक स्मृति ठेवुनी जाती दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती ॥ ध्रु ॥ चंद्र कोवळा, पहिला वहिला, झाडामागे उभा राहिला जरा लाजुनि, जाय उजळुनी, काळोखाच्या राती ॥ १ ॥ अशी पाखरे येती, आणिक स्मृति ठेवुनी जाती. फुलून येता फुल बोलले, मी मरणावर हृदय तोलले नव्हते नंतर, परी निरंतर, गंधित झाली माती ॥ २ ॥ अशी पाखरे येती, आणिक स्मृति ठेवुनी जाती हात एक तो हळु थरथरला, पाठीवर मायेने फिरला देवघरातिल समईमधुनी, अजून जळती वाती ॥ ३ ॥ अशी पाखरे येती, आणिक स्मृति ठेवुनी जाती कुठे कुणाच्या घडल्या भेटी, गीत एक मोहरले ओठी त्या जुळल्या हृदयांची गाथा, सूर अजुनही गाती ॥ ४ ॥ अशी पाखरे येती, आणिक स्मृति ठेवुनी जाती दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती.
Writer(s): Mangesh Padgaokar, Yashwant Deo Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out