Lyrics

तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ रंगमहाल नका सोडून जाऊ रंगमहाल पापण्यांची तोरणं बांधून डोळ्यावरती पापण्यांची तोरणं बांधून डोळ्यावरती ही नजर उधळीते काळजातली पिरती ही नजर उधळीते काळजातली पिरती जवळी यावं, मला पुसावं गुपित माझं खुशाल —गुपित माझं खुशाल तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ रंगमहाल हुरहूर म्हणू की ओढ म्हणू ही गोड हुरहूर म्हणू की ओढ म्हणू ही गोड या बसा मंचकी सुटल गुलाबी कोडं विरह जाळीता मला रात ही पसरी माया जाल —पसरी माया जाल तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ रंगमहाल लाडे-लाडे अदबीनं तुम्हा विनवते बाई लाडे-लाडे अदबीनं तुम्हा विनवते बाई पिरतीचा उघडला पिंजरा तुमच्या पायी पिरतीचा उघडला पिंजरा तुमच्या पायी अशीच रहावी रात, साजणा, कधी न व्हावी सकाळ —कधी न व्हावी सकाळ तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ रंगमहाल नका सोडून जाऊ रंगमहाल
Writer(s): Ram Kadam, Jagdish Khebudkar Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out