Lyrics

नभ व्याकुळ राहिला... नभ व्याकुळ राहिला त्याला आसमंती आस किती साद घाली जिवा तंव चातकाची कास कशा बेभान या दिशा... कशा बेभान या दिशा, कसा बेभान हा वारा सुटे पहाटेचा वारा, दाटे ढगांचा पसारा सुटे पहाटेचा वारा, दाटे ढगांचा पसारा हाक पावसाची बळी व्याकुळ-व्याकुळ हाक पावसाची बळी व्याकुळ-व्याकुळ निळ्या सावल्या ढगांच्या, मनी पांगुळ-पांगुळ निळ्या सावल्या ढगांच्या, मनी पांगुळ-पांगुळ रात उरासवे कुंद... रात उरासवे कुंद तिज चांदणे कुंपण लाली दाटली गं नवी, रंगे विराने गोंदण कशा बेभान या दिशा... कशा बेभान या दिशा, कसा बेभान हा वारा सुटे पहाटेचा वारा, दाटे ढगांचा पसारा सुटे पहाटेचा वारा, दाटे ढगांचा पसारा वाट परतीची गायी, "चालल्या गं घरा" वाट परतीची गायी, "चालल्या गं घरा" सरी पावसाच्या आर्त कशा आल्या गं गतीला गारा बरसल्या खाली... गारा बरसल्या खाली, गंध दाटला मातीला झाला पावन हा देह, पेटे वैशाख वणवा कशा बेभान या दिशा... कशा बेभान या दिशा, कसा बेभान हा वारा सुटे पहाटेचा वारा, दाटे ढगांचा पसारा सुटे पहाटेचा वारा, दाटे ढगांचा पसारा
Writer(s): Prajakta Gavhane, Tejas Chavan, Shankar Jambhalkar Lyrics powered by www.musixmatch.com
Get up to 2 months free of Apple Music
instagramSharePathic_arrow_out