Lyrics

तुझी रे उलटी सारी तऱ्हा तुझी रे उलटी सारी तऱ्हा तुझी रे उलटी सारी तऱ्हा सौंदर्याची दौलत टाकुन... सौंदर्याची दौलत टाकुन जासी भलत्या घरा तुझी रे उलटी सारी तऱ्हा तुझी रे उलटी सारी तऱ्हा राजमंदिरी असंख्य नारी रूपवती त्या अतुल सुंदरी रूपवती त्या अतुल सुंदरी तुडवुन त्यांची नाजुक सुमने जासी परदारा उलटी सारी तऱ्हा तुझी रे उलटी सारी तऱ्हा शोभे का हे तुला माधवा? शोभे का हे तुला माधवा? गाल-बोट हे तुझिया नावा सोडुन दे ती कुब्जा-काळी... सोडुन दे ती कुब्जा काळी, सोडुन दे श्रीधरा तुझी रे उलटी सारी तऱ्हा तुझी रे उलटी सारी तऱ्हा हात जोडीते, पदर पसरिते तुजविण जीवन उदास गमते हात जोडीते, पदर पसरिते तुजविण जीवन उदास गमते तुझ्या पदाविण दिसे भुकेला... तुझ्या पदाविण दिसे भुकेला सोन्याचा उंबरा तुझी रे उलटी सारी तऱ्हा तुझी रे उलटी सारी तऱ्हा, सारी तऱ्हा तुझी रे उलटी सारी तऱ्हा तुझी रे उलटी सारी तऱ्हा तुझी रे उलटी सारी तऱ्हा
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out