Lyrics

कधी बहर, कधी शिशिर परंतु दोन्ही एक बहाणे डोळ्यांमधले आसू पुसती ओठांवरले गाणे डोळ्यांमधले आसू पुसती ओठांवरले गाणे, ओठांवरले गाणे बहर धुंद वेलीवर यावा हळुच लाजरा पक्षी गावा, पक्षी गावा बहर धुंद वेलीवर यावा हळुच लाजरा पक्षी गावा, पक्षी गावा आणि अचानक गळुन पडावी आणि अचानक गळुन पडावी विखरुन सगळी पाने डोळ्यांमधले आसू पुसती ओठांवरले गाणे, ओठांवरले गाणे भान विसरुनी मिठी जुळावी पहाट कधी झाली न कळावी भान विसरुनी मिठी जुळावी पहाट कधी झाली न कळावी भिन्न दिशांना झुरत फिरावे भिन्न दिशांना झुरत फिरावे नंतर दोन दिवाणे डोळ्यांमधले आसू पुसती ओठांवरले गाणे, ओठांवरले गाणे हळुच फुलांच्या बिलगुनी गाली नाजुक गाणी कुणी गायिली? हळुच फुलांच्या बिलगुनी गाली नाजुक गाणी कुणी गायिली? आता उरली आर्त विराणी आता उरली आर्त विराणी सूरच केविलवाणे डोळ्यांमधले आसू पुसती ओठांवरले गाणे, ओठांवरले गाणे जुळली हृदये, सूरही जुळले तुझे नि माझे गीत तरळले, गीत तरळले जुळली हृदये, सूरही जुळले तुझे नि माझे गीत तरळले, गीत तरळले व्याकुळ डोळे कातरवेळ व्याकुळ डोळे कातरवेळ स्मरुन आता जाणे
Writer(s): Mangesh Padgaokar, Yashwant Deo Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out