Featured In

Lyrics

सदा-सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गूणवंता अनंता रघूनायका मागणे हेचि आता कैलास राणा शिव चंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदु:ख हारी तुजवीण शंभू मज कोण तारी? मोरया-मोरया मी बाळ तान्हे तुझीच सेवा करु काय जाणे अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी ज्या-ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या-त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठीकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तंया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सदगुरु ज्ञानेश्वराशी
Writer(s): Sanjeevani Bhelande Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out