Lyrics

आई तुझी आठवण येते सुखद स्मृतींच्या कल्लोळांनी काळीज का जळते वात्सल्याचा कुठें उमाळा, तव हातांचा नसे जिव्हाळा हृदयांचे मम होऊन पाणी, नयनीं दाटून येते आई तुझ्याविण जगीं एकटा, पोरकाच मज म्हणति करंटा व्यथा मनींची कुणास सांगूं, काळीज तिळतिळ तुटतें हांक मारितो 'आई' 'आई', चुके लेकरूं सुन्या दिशाही तव बाळाची हांक माउली का नच कानीं येते
Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out